Pune Heavy Rain : पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांची उडाली तारांबळ

Pune Rain Updates : एकीकडे उकाड्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. 

या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात देखील सोसाट्याच्या वार्‍यासह अचानक गारांच्या पावसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.

पुण्यातील बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. यासोबतच खडकी परिसरात अचानक ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाळा सुरुवात झाली. 

पुणे शहराला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने चांगलच झोडपलं आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर घामेघूम झालेल्या पुणेकरांना वरूणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

पुण्यात येलो अलर्ट जाहीर

हवामान खात्याकडून पुढील २ दिवस पुण्यात  येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी देखील पुण्यात मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply