Pune Rain Updates : पुण्यात भल्यापहाटे मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली तारांबळ

Pune Rain News : तब्बल दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे.

पुण्यातील काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही परिसरात मुसळधार तर पावसाच्या हलक्या सरी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसाने पाठ फिरवली होती. उन्हाच्या झळा बसत असल्याने पुणेकरांना उकाडा जाणवत होता.

या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यामुळे पाऊस नेमका कधी कोसळणार? याची वाट शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, आज म्हणजेच शनिवारी पहाटेच्या सुमारास पुण्यात ढग दाटून आले. काहीच वेळात पावसाला सुरूवात झाली.

शहरातील वारजे, शिवणे कात्रज, कोंढवा, स्वारगेट, तसेच सिंहगड रोड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. सकाळी कामावर निघालेले अनेकजण पावसामुळे अडकून पडले होते.

Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट

दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरातील पाणी कपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी साडे पाच वाजता कालवा समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बैठकीत काय निर्णय होतो? याकडेच पुणेकरांचं लक्ष लागून आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply