Pune Rain Updates : पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; हडपसर, मांजरी परिसरात बरसल्या पावसाच्या सरी

Pune Rain Updates  : राज्यात पुन्हा वादळी एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. दरम्यान, आज पुण्यात सकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहरातील कोथरूड परिसर, हडपसर, मांजरी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला.

याशिवाय वाघोली परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सकाळीच अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांची धांदल उडाली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारासही पुण्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळीच आभाळ भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पुण्यात पावसाने हजेरी लावली.

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, वादळी पाऊस हजेरी लावणार आहे. पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

पुण्यासह तब्बल १७ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस

पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply