Pune Rain : ताम्हिणीत महाविक्रमी ५५६ मिमी पाऊस, आदरवाडी येथे दरड कोसळुन ताम्हिणी- कोलाड रस्ता बंद, एकाचा मृत्यु

Pune : मुळशी धरण भागातील घाट माथ्यावर सुरु जोरदार अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे गुरुवार (ता. २५) पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर आदरवाडी (ता. मुळशी) येथे दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे

दरड कोसळून दगड माती वाहून रस्त्याबरोबरच जवळच असलेल्या हॉटेल गाडले गेल्याने एकाचा मृत्यु झाला. तर एक जण जखमी झाला. रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु. मुळशी धरण भागात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे चोवीस तासांत ५५६ मिमी. पाऊस झाला आहे

Pune Offices Closed : पुणेकरांसाठी मोठी बातमी ! पावसामुळे शाळांच्या पाठोपाठ ऑफिससुद्धा राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सुट्टी

या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, रस्ता बंद होणे असे प्रकार ठिकठिकाणी झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे आदरवाडी येथे रात्री २.३० वाजता डोंगराचा एक पुर्ण टपरा खाली कोसळला. डोंगर माथा ते रस्ता सुमारे ५०० मीटर रस्त्यापर्यंत दगड, माती, खराळ वाहून रस्ता व जवळच्या 'पिकनिक हॉटेल'वर गाडून गेले. दरड कोसळल्याच्या आवाजाने शेजारच्या हॉटेल मधील ग्रामस्थांनी 'पिकनिक हॉटेल' मधील दबलेल्या दोघांना बाहेर काढले.

परंतू त्यातील शिवाजी मोतीराम बहिरट, वय-३०, असे मयत तरुणाचे नाव असून अजून एक जण जखमी झाला आहे. दरम्यान ताम्हिणी-कोलाड रस्त्या वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रशासनाने दरड हटवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. वाहतुक सुरळीत होण्यासाठी ५ तास लागण्याची शक्यता आहे. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार रणजीत भोसले, पोलिस निरीक्षक मनोजकुमार याद‌व हे तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply