Pune Rain : पुण्याला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदीचे स्वरुप; ओढ्याला पूर आल्याने घरांमध्ये शिरले पाणी

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचा स्वरूप आले आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहे. कोथरुड परिसरातील ओढ्याला पूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पुण्याच्या कात्रज, घोरपडी, लोहगाव सिंहगड रस्ता, कोथरूड, विमाननगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर पाणीच पाणी साचले झाले असून रस्त्यांना नदींचे स्वरुप आले आहे. यामुळे वाहनचालकांसोबत प्रवाशांचे हाल होत आहे. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. या पाण्यामुळे रस्त्यावर वाहनं बंद पडली आहेत

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू; मनोज जरांगेंचा थेट इशारा

कोथरूडच्या शास्त्रीनगरमधील लाल बहादूर शास्त्री कॉलनी येथे घरामध्ये पाणी शिरले आहे. सागर कॉलनी ओढ्याला मोठा पूर आला आहे. त्यामुळे पाणी लालबहादूर शास्त्री कॉलनीच्या गल्लीतील घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे या घरांमधील संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचसोबत नव एकता कॉलनी गल्ली क्रमांक २ आणि ३ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पार्किंमध्ये असलेल्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

पुणे शहरात दुपारपासून जोरदार पाऊस पडत आहे. रस्त्यावर ड्रेंनेज लाईन फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. यामुळे वारजे- माळवाडी महामार्गावर पाणी-पाणी झाले आहे. या घाण पाण्यातूनच वाहनचालक कसाबसा मार्ग काढत प्रवास करत आहेत. पुण्यात गेल्या एका तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडीसह शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहे.

शिवाजीनगर येथील दीप बंगला चौकात वादळी वाऱ्याने झाड पडल्याने चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनांना पाण्यातून मार्ग काढून पुढे जावे लागत आहे. कर्वे पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रिक्षा दुचाकी आणि काही वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. लोहगावात पावसाचा जोर वाढला असून विमानतळ रस्त्यावर झाड पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply