Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढणार घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांमुळे पुण्यात मंगळवारी (ता.२५) दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात मॉन्सून सक्रीय झाला असून, पुढील काही दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गुजरातच्या कच्छ प्रांतातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांमुळे सध्या पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आता नव्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय हवेची स्थिती निर्माण होत आहे.

पर्यायाने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातच पावसाचा जोर वाढणार आहे. याच काळात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी दिवसभर पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. शहरात सरासरी १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लोहगाव येथे २.८ मिलिमीटर पडला.

Neral Crime : शिकारीला जंगलात नेलं, डोक्यात गोळी घालून तरुणाला जमिनीत पुरलं; बायकोच्या बॉयफ्रेंडचं भयंकर कृत्य

घाटमाथा आणि कोकणात पर्यटन टाळा

पुढील काही दिवसात कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्यापासून जोरदार जलप्रपात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply