
Pune : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील ५५ वर्षीय शेतकरी संजय जगन्नाथ जगताप यांचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जगताप यांच्या शेतात फ्लॉवर पिकाची काढणी सुरू होती. शेतामध्ये मजुरांसह कुटुंबातील सदस्य काम करत होते. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संजय जगताप आपल्या मुलांना मोटरसायकलवरून शेतावर पोचवण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे ते रस्त्याच्या बाजूला थांबले.
पावसापासून बचाव व्हावा यासाठी संजय जगताप अंगावर प्लास्टिकचा कागद घेत रस्त्याच्या कडेला उभे राहिले. अचानक विजेच्या कडकडाटासह त्यांच्यावर वीज कोसळली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या धक्क्यामुळे रस्त्यावर सुमारे दीड फुटाचा खड्डा पडला. या दुर्घटनेत जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भाऊजी तसेच आई-वडील असा मोठा परिवार आहे. संजय यांच्या मृत्यूमुळे जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
|
|
या घटनेची माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार अरुण शेलार आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वीज कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी वाऱ्याचा जोर वाढल्यास सुरक्षित आडोशाला थांबावे, झाडाखाली किंवा मोकळ्या जागी उभे राहू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
संजय जगताप यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे याच परिसरातील मगर मळा येथील ऊसतोड कामगारांच्या वस्तीजवळील एका नारळाच्या झाडावर कालच वीज कोसळली होती. या विजेमुळे झाडाला आग लागून झोपडीने पेट घेतला होता. त्यामध्ये दोन लहान मुलांना दुखापत झाली. सुदैवाने ते दोघेही बचावले असून सध्या त्यांच्यावर केडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

