Pune Rain : पुण्यात गारांसह मुसळधार पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Pune Rain : पुणे शहर आणि परिसरात दुपारपासून उन्हाच्या झळ्या कमी झाल्या होत्या पण ढगाळ वातावरणामुळं उकाडा जाणवत होता. अखेर संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहरात पावसानं दमदार हजेरी लावली. औंध, पाषाण भागात तर गारांसह पावसानं जोरदार पाऊस झाला. 

शहरातील औंध, पाषाण, कोथरुड, शिवाजीनगर या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची धांदल उडाल्याचं पहायला मिळालं. यामुळं रस्त्यांवर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडालेलं पहायला मिळालं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *