Pune Rain : पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; ढगफुटीसदृश पाऊस ; सखल भागात पाणी साचले

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार सुरू आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. सतंतधार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. यामुळे वाहन चालकांना कसरत करत गाडी चालवावी लागत आहे.या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

पुण्यात पावसाने गणेशोत्सवानंतर चांगलाच जोर धरला आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावासामुळे गावागावांत रस्ते, ओढे नाल्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून संध्याकाळी ७ वाजता ८५६ क्यूसेक्सने पाणी सोडले आहे.

पुणे शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरुप आले आहे. पुण्यातील दिघी परिसरात ढगफुटी झाल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेले वाहने देखील वाहून गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

पुण्यातील मुसळधार पावसामुळे चंदननगर पोलीस स्टेशन, वेदनभवन, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, सोमेश्वर वाडी,वानवडी, शितल पेट्रोल पंप , बी टी ईवडे रोड, काञज उद्यान या भागात पाणी साचले आहे. तर झाडपडी भागात एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, ज्योती हॉटेल , चव्हाणनगर, रुबी हॉलजवळील भागातही पाणी साचले आहे.

पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दाखविण्यात आल्याने रात्रीच्या अंधारात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply