Pune Rain: खडकवासला पूर्ण क्षमतेने भरले; मुठा नदीत विसर्ग सुरू

पुणे : आज पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० % भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये संध्याकाळी ०७ वाजता ८५६ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्री ८ वाजता हा विसर्ग वाढवण्यात येणार असून २,५६८ क्यूसेक करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये कमी जास्त बदल केला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन ते तीन तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. शहरात गेल्या तीन तासापासून पाऊस चालू असल्याने शहरातील काही घरात पाणी घुसले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन तासात कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे शहरातील 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या नोंदी असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत आहेत. दरम्यान, पावसामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply