Pune : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने भारताच्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’च्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ७०० किलोमीटर रेल्वेमार्गापैकी २५० मार्गावर नॉन-सिग्नलिंग कवच चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या काळात आणखी मार्गांवर या चाचण्या घेऊन कवच प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यात मदत होणार आहे.
अपघात घटविण्याचा उद्देश
रेल्वे बोर्डाने ‘कवच’प्रणाली प्रामुख्याने रेल्वे अपघातांची संख्या शून्य करण्याच्या आणि रेल्वे प्रवासाची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने लागू केली. हे स्वदेशी तंत्रज्ञान समोरासमोरच्या टक्कर, लाल सिग्नल ओलांडणे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी; तसेच मानवी चुका टाळण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.
टप्प्याटप्प्याने बसविणार
ही प्रणाली सर्वत्र टप्प्याटप्प्याने बसविण्याचे काम सुरू आहे. पुणे रेल्वे विभागात सातशे किलोमीटर अंतर असून, त्या ठिकाणी कवच प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कवचच्या चाचण्यांमध्ये पुणे-कोल्हापूर, दौंड-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. या ठिकाणच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कवच टप्पा-२ अंतर्गत पढेगाव, बेलापूर आणि राहुरी या तीन स्थानकांवर प्रणालीची स्थापना पूर्ण झाली आहे; तसेच दौंड-येवला विभागात स्थापनेचे काम वेगाने सुरू आहे. दूरसंचार पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजित १२३ टॉवरपैकी ५३ कवच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी मार्गावर कवच प्रणालीचे काम वेगाने सुरू आहे.
नोव्हेंबरमध्ये काम सुरू
रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार लोकोमोटिव्हमध्ये कवच ‘टीम’ला नामांकन
कर्नेक्स या संस्थेच्या समन्वयाने उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून हे काम प्रथमच शेडमध्ये पूर्ण करण्यात आले. कार्यक्षमता, वेग आणि गुणवत्तेच्या दृष्टीने काम करणाऱ्या टीमला पुरस्कारासाठी नामांकनही देण्यात आले असून, या उपक्रमाची पुणे विभागाच्या ‘उत्कृष्ट कार्य’ म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
प्रणाली बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. पुणे डिझेल व इलेक्ट्रिक लोको शेड येथे हे काम गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू केले होते. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांत त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कालावधीत वॅप-७ प्रकारातील चार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली यशस्वीरीत्या बसवून तपासणीनंतर सेवेसाठी सोडण्यात आली.
‘टीम’ला नामांकन
कर्नेक्स या संस्थेच्या समन्वयाने उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून हे काम प्रथमच शेडमध्ये पूर्ण करण्यात आले. कार्यक्षमता, वेग आणि गुणवत्तेच्या दृष्टीने काम करणाऱ्या टीमला पुरस्कारासाठी नामांकनही देण्यात आले असून, या उपक्रमाची पुणे विभागाच्या ‘उत्कृष्ट कार्य’ म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel