Pune Railway : रेल्वेत ३५ हजार फुकटे प्रवाशी; एकाच महिन्यात ३ कोटी १२ लाखाचा दंड वसूल

पुणे : रेल्वेच्या गर्दीत अनेकजण तिकीट न काढताच प्रवास करत असतात. अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जात असते. अशाच प्रकारे पुणे रेल्वे विभागात एप्रिल २०२४ मध्ये तिकीट तपासणी दरम्यान ३५ हजार १२९ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी १२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Mumbai Crime : चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने रेल्वेतील प्रवाशांची संख्या आणखीन वाढली आहे. दरम्यान उन्हाळी सुट्या असल्याने पर्यटनासाठी निघणारे प्रवाशी देखील अधिक असून यासाठी बहुतांश प्रवाशी आरक्षण करून घेत असतात. तर काही प्रवाशी हे विना तिकीट प्रवास करत असतात. तरी रेल्वे प्रशासनाकडून चेकिंग होत असताना देखील बिनधास्त विना तिकीट प्रवास करत असतात. अशांवर पुणे विभागाने एप्रिल महिन्यात मोठी कारवाई करत दंड वसूल केला आहे. 

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ३५ हजार १२९ इतकी आहे. तर १४ हजार ४६३ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ९३ लाख ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २४३ प्रवाशांकडून ३३ हजार ६९० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply