Pune Porsche Crash: ससून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे ते दोघे कोण? रक्ताच्या नमुन्याच्या अदलाबदली वरून संशय वाढल

 Pune Porsche Crash : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताचा तपास करणाऱ्या पुणे शहर पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले की, ससून हॉस्पिटलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने गोळा केले आणि त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले तेव्हापासूनची सर्व माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर आणखी काही संशयित त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे पालक यांच्यासह ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि आईला आरोपीचे मूळ रक्ताचे नमुने आरोपी डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने दिले होते का आणि त्यांनीच ते नष्ट केले होते का, याचा तपास करत असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आई आणि वडिलांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Memu Train : 'मेमू'साठी रेल्वेच्या दोन विभागांची 'धावाधाव'; पुणे व भुसावळ विभागांत रस्सीखेच

ससून रुग्णालयात १९ मे रोजी घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची सरकारी रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी यांच्या संगनमताने अदलाबदल केल्याच्या आरोपावरून पुणे शहर पोलिसांनी शनिवारी ४९ वर्षीय आईला अटक केली आणि ५० वर्षीया वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

अल्पवयीन आरोपीच्या रक्तात अल्कोहोल होते की नाही ते तपासण्यासाठी गोळा केलेल्या 17 वर्षाच्या मुलाच्या नमुन्याशी अदलाबदल करण्यासाठी आईने रक्त दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आई आणि वडिलाना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे पोलिसानी त्यांच्या संयुक्त चौकशीसह पुढील तपासासाठी कोठडी मागितली.

पोलिसांनी यापूर्वी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, त्यावेळी अपघाती वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. श्रीहरी हरनोळ आणि शवागृहातील कर्मचारी अतुल पाटकांबळे यांना ब्लड सम्मल बदलल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पोलिसांची न्यायालयात माहिती

अपघातातील अल्पवयीन आरोपी हा रक्त देण्यासाठी रूग्णालयात आला तेव्हा तो आलिशान कारमध्ये आला, तेव्हा त्यातून तीन व्यक्ती तिथे पोहोचले होते. रक्तनमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्या व्यक्ती कोण याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.
सीसीटीव्ही' चित्रीकरणात दिसताहेत संशयित

विशाल व शिवानी अगरवाल यांच्या रक्ताचा नमुना घेऊन 'डीएनए' तपासणीसाठी पाठवायचा आहे. तसेच रक्ताचा नमुना घेतलेल्या दिवशी रुग्णालयातील 'सीसीटीव्ही' मध्ये काही संशयित दिसत असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे,' असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले आहे.

कल्याणीनगर येथे १८ मे रोजी मध्यरात्री आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला कार दिल्याप्रकरणी वडिलांवर आणि पबमध्ये दारू दिल्याने पदच्या चालक-मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply