Pune Porsche Case : अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टरची प्रकृती बिघडली; कोठडीत होतोय इन्फेक्शनचा त्रास

Pune Porsche Case : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या दोन डॉक्टरांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने दोन्ही डॉक्टरांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, यातील एका डॉक्टरची पोलीस कोठडीत प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.

डॉक्टर श्रीहरी हळनोर याला सध्या इन्फेक्शनचा त्रास होत आहे. अद्याप त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नसून कोठडीतच ठेवण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीतच त्याच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांकडून दोन्ही डॉक्टरांची कसून चौकशी केली जात आहे.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात, ट्रकचालकाने दुचाकीस्वार तरुणांना फरफटत नेलं; दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाने सुसाट कार चालवत कल्याणीनगर परिसरात एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा नशेत असल्याचा आरोप करण्यात आला.

पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलं. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलले. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन दोघांनीही आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केली.

यासाठी दोन्ही डॉक्टरांनी आरोपीच्या वडिलांकडून लाखो रुपये घेतले. ही बाब उघड होताच पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता, दोघांनाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलीस सध्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. चौकशीतून नेमकं काय सत्य समोर येतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply