Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मृत तरुणीच्या भावाची मागणी

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने  दिले आहेत. आरोपीला या प्रकरणात जामीन मिळाला आहे. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या अश्विनी कोस्टा या तरुणीच्या भावाने हे अपघात प्रकरणा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी केली आहे.
 
पुणे पॉर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाच्या आत्याने त्याची बाल सुधारगृहातून सुटका व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सुटका झाल्यावर मुलाचा ताबा त्याच्या आत्त्याकडेच असेल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
 
दरम्यान, १९ मे रोजी मध्यरात्री आरोपी मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले होतो. कार चालवाताना आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि पुण्यामध्ये ते नोकरी करत होते. दोघेही इंजिनिअर होते. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून ते दुचाकीवरून आपल्या मित्रांसोबत येरवड्याच्या दिशेला जात असताना त्यांना पोर्शे कारने धडक दिली होती. या अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply