Pune Porsche Car Accident : ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, मुंबईतून अटक केलेल्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील  आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दोघांनाही न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस  कोठडी सुनावली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून मंगळवारी या दोघांना अटक केली होती.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर, शिपायी आणि आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. या सर्वांच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावं समोर आली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना मुंबईतून अटक केली.

Pune News : SSC JE परीक्षेपासून विद्यार्थी मुकले, पुण्यातील केंद्रावर नेमकं काय घडलं

मुंबईतून अटक करण्यात आलेल्या या दोघांचा रक्ताचे नमुने बदलण्यात हात होता. अटकेनंतर या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी ३ लाख रुपये दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply