Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपी मुलाला जामीन मंजूर

Pune Porsche Accident Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहाच्या कस्टडीतून सुटका करण्यात आली आहे. मुंबई हायकार्टाने या मुलाला दिलासा दिला आहे. या मुलाची कस्टडी त्याच्या आत्याकडे देण्यात आली आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. या दोघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील रस्त्यावर भरधाव कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय. पुणे पोलिसांनी जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटलं. त्यानंतर या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर गंभीर गुन्हे दाखल करा; अन्यथा आत्मदहन करेन, विभागीय आयुक्तांना कुणी दिला इशारा?

मुलाच्या आत्याने दाखल केली होती याचिका

मुलाची आत्या पूजा यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने अल्पवयीन मुलाची कस्टडी त्याच्या आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने अल्पवयील आरोपीला दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात वकीलांनी म्हटलं की, मुलाच्या आत्याने हेबियस कॉर्पसअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. कोर्टात सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला. अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा पोलीस ताब्यात घेऊ शकत नाही, या पार्श्वभूमीवर याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने अल्पवयीला आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपी मुलाची कस्टडी आत्याकडे देण्यात आली आहे. कोर्टाचे ऑर्डर आले आहेत. त्यात पोलिसांच्या तपासाविषयी काही माहिती समोर आलेली नाही'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply