Pune Porsche Accident : बाल न्याय मंडळातच लाच; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, कोण-कोण अडकणार?

Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्फाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलिसांना मिळाले आहे.

ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्या सांगण्यावरूनच घटकांबळे याने हे पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pune : पक्षांच्या थव्यांमुळे पुणे विमानतळाची धावपट्टी बंद, सहा विमानांना उशीर, प्रवाशांना मनस्ताप

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी हा कट शिजवण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन लाख रुपये जप्त केले आहेत. त्यापैकी डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये, तर घटकांबळेकडून उर्वरित ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले आणि त्याच दिवशी या आर्थिक रकमेची देवाणघेवाण झाल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले आहे.

बाल न्याय मंडळाच्या परिसरात घटकांबळेने मकानदारकडून ही रक्कम स्वीकारल्याचे परिसरातील ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्या’त कैद झाले आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. मकानदार त्याच्या दुचाकीतून पैसे घेऊन आल्याचे निदर्शनास आले असून, या दुचाकीचा पोलिस शोध घेत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply