Pune Porsche Accident : चालकाचे अपहरण, गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव.. अल्पवयीन मुलाच्या आजोबाला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबांना न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत मुलाच्या आजोबाला गुन्हे शाखेने अटक केली आहे

सुरेंद्रकुमार अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचे नाव आहे. शनिवारी (ता. २५) सकाळी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यासह मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर देखील याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar : सुपा बसस्थानक ते पारनेर रस्त्याने घेतला माेकळा श्वास, शेकडाे अतिक्रमणे जमीनदाेस्त

चालक गंगाधर शिवराज हेरीकुब (वय ४२) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना दुपारी तीन वाजता सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते

दरम्यान, याच प्रकरणामध्ये शुक्रवारी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश आहे. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते.

दुसरीकडे शुक्रवारीच या प्रकरणात तपास अधिकारी बदलला आहे. पोलिस अधिकारी आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे अपघात प्रकरणाचा तपास देण्यात आलेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply