Pune Politics : पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड; काँग्रेस नेत्याच्या हकालपट्टीची मागणी, भाजपच्या वाटेवर असल्याची होती चर्चा

Pune Politics : पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर बागुल हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. बागुल यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आबा बागुल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आबा बागुल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. आबा बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

Lok Sabha Election : जम्मूमध्ये प्रचाराला वेग

आबा बागुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, यावर काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात काल (२१ एप्रिल) काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला पृथ्वीराज  चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. आबा बागुल यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातून  कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. रवींद्र धगेंकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी उमेदवारीवरून नाराजी बोलून दाखवली होती. मागील काही दिवस त्यांची नाराजी कायम होती.

आबा बागुल यांनी रवींद्र धगेंकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं (Pune Congress) होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची पक्षातुन हकालपट्टीची मागणी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply