Pune Political News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपामध्येच रस्सीखेच? तीन नेत्यांची नावे चर्चेत

Pune News : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होईल. गिरीश बापट यांच्यानंतर भाजप याठिकाणी कुणावर विश्वास दाखवणार हा प्रश्न आहे. मात्र पोटनिवडणुकीसाठी आता इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. भाजपची ही हक्काची जागा असल्याचं मानलं जातं. म्हणूनच या जागेवर आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरु झाली आहे.

भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे या तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडूनही काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर शहरात लागले होते. त्यामुळे मुळीक यांचं नावही याठिकाणी लोकसभेसाठी चर्चेत आलं होतं. गिरीश बापट यांच्या निधनानंतर काही दिवसातचं लागलेल्या या बॅनरवरुन विरोधकांनी जगदीश मुळीक यांच्यावर निशाणा देखील साधला होता. 

एकीकडे भाजपमधून अनेक नावांची चर्चा सुरु आहेत. मात्र भाजप गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडी देखील जनभावनेच मान राखत निवडणूक बिनविरोध करु शकते. मात्र निवडणूक झाली तर कुणाचं पारडं जड ठरेल हे येणार काळच ठरवेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply