Pune Police : पुण्यात हुक्का पार्लर बंद होणार; बार, पब, रेस्टॉरंटला वेळेचं बंधन, अमितेश कुमार यांचा निर्णयांचा धडाका

Pune Police : पुण्यात पकडलेल्या ४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद  घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी भार स्विकारला आहे. 

पुणे पोलीस  आता अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसतंय. पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस आता नोटीस पाठवणार आहेत. कलम १४४ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येणार आहे. आता पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजेनंतर सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.

Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येऊ शकतात; सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य

पुणे शहरातील हुक्का पार्लर बंद

पुणे पोलीस रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर ठेवणार आहेत. शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. पुण्यात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.

पुणे पोलीस अलर्ट मोडवर

पोलीस ठाण्यात ५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार (Pune Crime) आहे. तसंच कुठलाही अधिकारी जर एकच ठिकाणी ३ वर्षांपासून असेल. त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तिथेच असेल तर त्याची सुद्धा बदली केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या ५० सोशल अकाउंटवर कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार आल्यानंतर गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी क्राईम इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणेसह सराईत गुन्हेगारांची परेड घेतली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply