Pune PMPML Bus Accident : पुण्यात PMPMLच्या २ बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात २९ प्रवासी जखमी; पुणे-नगर महामार्गावरील घटना

Pune PMPML Bus Accident : पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या दोन बसेसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही बसने समोरासमोर धडक दिली. पुणे-नगर महामार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसच्या वाहक आणि चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही बसेसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण- नगर महामार्गावर सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. या महामार्गावरील जनक बाबा दर्ग्याजवळील बीआरटी थांबा परिसरात पीएमपीएमएलच्या बसेसने समोरासमोर जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघातामध्ये २९ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली ही बस वाघोलीच्या दिशेने जात होती. तर तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुणे शहराच्या दिशेने जात होती. याचवेळी बीआरटी थांबा परिसरात पावणे नऊच्या सुमारास दोन्ही बसने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये दोन्ही बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. अपघातामध्ये बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. चालक आणि जखमी प्रवाशांना तात्काळ ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर पुणे- नगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply