PMPML Bus: पुण्यात बसमध्ये आता 'गुगल पे', 'फोन पे' नं तिकीट काढता येणार; पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune PMPL News : पुणे पीएमपीएलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएमपीएलच्या बसेसमध्ये युपीआय पेमेंट म्हणजेच फोन- पे गुगल- पे वरुन तिकीट काढता येईल. पुढील आठवड्यापासून सर्व बसेसमध्ये स्कॅनरची सुविधा बसवण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस प्रवास करताना सुट्ट्या पैशांसाठी वाद होणे काही नवीन नाही. आता या सुट्ट्या पैशांच्या टेन्शनमधून पुणेकरांची कायमची सुटका होणार आहे. पुण्यातील पीएमपीएल बसमध्ये पुढील आठवड्यापासून गुगल पे (Phone Pay), फोन पे (Google Pay), पेटीएम (ATM) म्हणजेच युपीआय तिकीट काढण्याची सुविधा सुरु होणार आहे.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम; तूर्त उपोषणावर ठाम

सुट्ट्या पैशावरुन वाहक आणि प्रवाश्यांमध्ये वाद होत असल्याचे प्रकार समोर येत होते. तसेच अनेक वाहक सुट्टे पैसे परत करत नसल्याच्या तक्रारीही प्रवाश्यांकडून येत होत्या. त्यामुळेच आता सर्व बसेसमध्ये युपीआय पेमेंट (UPI Payment) सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यापासून पीएमपीएलच्या सर्व बसेसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार आहेत. हे तिकीटाचे पैसे थेट पीएमपीच्या खात्यात जमा होणार होतील. या युपीआय पेमेंट प्रणालीमुळे भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply