Pimpri : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हवाई दलाचा टेम्पो उलटला; मोठी वाहतूक कोंडी

Pimpri: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडीत समतल विलगकामध्ये ( ग्रेड सेपरेटर) हवाई दलाचा टेम्पो उलटला. दुचाकीस्वाराला वाचविताना टेम्पो उलटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता. समतल विलगातून जात असताना मोरवाडीत टेम्पोला एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविताना टेम्पो उलटला. टेम्पोतून रस्त्यावर ऑइल गळती झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी टेम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. खराळवाडीतून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

पिंपरी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन विभागाला बोलविण्यात आले. पाण्याने रस्ता धुवून काढला आहे. दरम्यान, टेम्पो सरळ करण्यासाठी क्रेन बोलविण्यात येणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *