Pune : Covid Center घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकरांसह तिघांवर पुण्यात गुन्हा दाखल

Pune  : लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या फर्मला जंबो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होणेकरता बनावट पार्टनरशिप डिड तयार करून सदरची निविदा मंजूर करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुजित पाटकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक भागिदार आहेत. हा गुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर पाेलिसांनी दाखल केला आहे.

राजू लक्ष्मण ठाणगे (कार्यकारी अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. भाजप नेते किरीट साेमय्या यांनी ट्विट करुन खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर आणि अन्य भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांचा विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे म्हटलं आहे.

पुणे शहर (FIR No. 80/2023 IPC Sections 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34) काल रात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती साेमय्या यांनी दिली.साेमय्या म्हणाले शिवाजीनगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट फसवणुकीने मिळविले, ३ कोवीड रुग्णाचे मृत्यू अनेक कोवीड रुग्णाचे कायमचे नुकसान संबंधात मी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी याबाबत तक्रार केली हाेती. त्यानूसार गुन्हा दाखल झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply