Pune News : मीरा बोरवणकरांचा 'दादां'वर गंभीर आरोप; येरवड्यातील पोलिसांची जमीन विक्रीसाठी दबाव आणल्याचा पुस्तकात दावा

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकताच पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाले. मात्र, पुण्यातल्या येरवडा येथील जमिनीवरून अजित पवार यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या "मॅडम कमिशनर" या पुस्तकात धक्कादायक खुलासे करण्यात आले असून अजित पवार यांचे थेट नाव न घेता हे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान बोरवणकर यांनी केलेल्या या आरोपांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Pune Crime : तस्करांवर मोठी कारवाई; पुण्यातून १३४ किलो गांजा, तर मुंबईसह 3 शहरांतून ३१ किलो सोनं जप्त

मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशन या पुस्तकात, पुण्याच्याआयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०१० मध्ये एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांना येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांना एकदा भेटा असं सांगितलं. त्यांनतर पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्थानकाचा नकाशा होता. त्यांनी हा नकाशा दाखवत, या जागेचा लिलाव झाला असून जमीन हस्तांतराची प्रक्रिया पार पाडावी, असं सांगितलं. मात्र मी, येरवडा हे पुण्यातील मध्यावर्ती ठिकाण आहे. कार्यालय आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं पालकमंत्र्यांना सांगितलं, मात्र, त्यांनी माझं ऐकलं नाही. जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला, असं बोरवणकर यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं थेट नाव घेतलेलं नाही. फक्त मंत्री 'दादा' असा उल्लेख केला आहे. मात्र २०१० मध्ये ज्यावेळी मीरा बोरवणकर यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. पुण्यातील येरवडातील या ३ एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते असा उल्लेख "मॅडम कमिशनर" या पुस्तकाच्या द मिनिस्टर या प्रकारणामध्ये करण्यात आला आहे. पॅन मॅकमिलन पब्लिशिंग हाऊस हे पुस्तक आज बाजारात आणणार आहे.

दरम्यान अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या जमिनी लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेतं. रेडीनेकरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply