Pune : मुंढवा चौक ते मुंढवा रेल्वे पूल, तीस वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे एका रात्रीत केले रुंदीकरण

Pune  : मुंढवा चौक ते मुंढवा रेल्वे पूल या सुमारे २०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण गेल्या तीस वर्षांपासून रखडल्याने हडपसर-खराडी रस्त्यावर बॉटलनेक निर्माण झाला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. अखेर महापालिकेच्या विविध विभागांनी एकत्रित येत एका रात्रीत अतिक्रमण काढण्यासह रस्ता तयार करण्याचे पूर्ण केले आहे.

शहरातील अर्धवट रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा मिसिंग लिंक शोधून हे रस्ते प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हडपसर खराडी हा विकास आराखड्यातील रस्त्यावर १९९१- ९२ च्या सुमारास या भागातील जमिनींवर शेती झोन होता. त्यामुळे जागा मालकांना कमी मोबदला मिळाला आहे असा त्यांचा आक्षेप होता. त्या कारणाने रस्ता रुंदीकरणात अडथळे निर्माण झाले होते.

पण वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता मोठा करावा यासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरु होते. यासाठी जागा मालकांच्या बैठका घेऊन त्यांची समजूत काढण्यात आली. पण तरीही रस्त्याचे काम करताना कोणाचाही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने गुप्तता राखत शुक्रवारी रात्री ११ वाजता काम सुरू केले.

यामध्ये पथ विभागासह भूसंपादन, विद्युत, अतिक्रमण निर्मूलन, हडपसर आणि मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग यांनी समन्वयाने काम करत आपापली कामे पटापट सुरु करून सकाळी ६ पर्यंत सीमा भिंत पाडणे, टपऱ्या, स्टॉल, पत्र्याचे शेड, पत्रे लावून अडवलेली जागा रिकामी करणे अशी बहुतांश कामे पूर्ण केली. विद्युत विभागाने पथ दिव्यांचे नियोजन केले. यावेळी स्थानिक पोलिसांनी बंदोबस्तही दिला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनीही रात्रभर जागेवर थांबून कामे करून घेतली.

Ratan Tata: रतन टाटांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन केला गौरव

यामध्ये पथ विभागासह भूसंपादन, विद्युत, अतिक्रमण निर्मूलन, हडपसर आणि मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग यांनी समन्वयाने काम करत आपापली कामे पटापट सुरु करून सकाळी ६ पर्यंत सीमा भिंत पाडणे, टपऱ्या, स्टॉल, पत्र्याचे शेड, पत्रे लावून अडवलेली जागा रिकामी करणे अशी बहुतांश कामे पूर्ण केली. विद्युत विभागाने पथ दिव्यांचे नियोजन केले. यावेळी स्थानिक पोलिसांनी बंदोबस्तही दिला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनीही रात्रभर जागेवर थांबून कामे करून घेतली.

यामध्ये पथ विभागासह भूसंपादन, विद्युत, अतिक्रमण निर्मूलन, हडपसर आणि मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग यांनी समन्वयाने काम करत आपापली कामे पटापट सुरु करून सकाळी ६ पर्यंत सीमा भिंत पाडणे, टपऱ्या, स्टॉल, पत्र्याचे शेड, पत्रे लावून अडवलेली जागा रिकामी करणे अशी बहुतांश कामे पूर्ण केली. विद्युत विभागाने पथ दिव्यांचे नियोजन केले. यावेळी स्थानिक पोलिसांनी बंदोबस्तही दिला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनीही रात्रभर जागेवर थांबून कामे करून घेतली.

‘‘हडपसर खराडी २४ मीटर रस्त्यावर मुंढवा चौक ते मुंढवा रेल्वे पूल या भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. महापालिका प्रशासनाने जागा मालकांशी चर्चा करून ही जागा ताब्यात घेऊन एका रात्रीत रस्ता केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्हीला १० फूट जास्त जागा उपलब्ध झाली आहे.’’

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply