Pune : वाहतुक कोंडीतून पुणेकरांची सुटका! चांदणी चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला; आज उद्घाटन

Pune News: गेल्या काही महिन्यांपासून पुणे नव्हे तर देशभर चर्चेत असलेल्या पुण्यातील चांदणी चौकाचे काम हे पूर्ण झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांचे उद्घाटन होणार आहे.

आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार होते, मात्र अचानक त्यांच्या दौऱ्यात बदल झाला असून ते येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्यानंतर सात वर्षे रखडलेल्या चांदणी चौकातील पुलाने अवघ्या दहा महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण केले. आज चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार आहे.

Kalyan : उल्हास नदीत पोहताना अल्पवयीन मुलगा बुडाला, वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला; अग्निशमन दलाकडून शोध सुरु

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती...

या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला असून मुख्यमंत्री साताऱ्याला त्यांची गावी असल्याने येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

२८ फेब्रुवारी २०१९ ला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. तब्बल ४०० कोटी रुपये खर्च करुन हा पुल बनवण्यात आला आहे. या पुलावरुन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रति तासाला सुमारे १ लाख वाहने जातात तर इतर वेळी प्रतितास ३० हजार वाहने जातात.

असे आहेत चांदणी चौकातील ८ रॅम्प....

१. मुळशी - सातारा

२. मुळशी - मुबंई

३. मुळशी - पाषाण

४. सातारा - कोथरूड ते मुळशी

५. पाषाण - मुबंई

६ .पाषाण - सातारा

७. सातारा - कोथरूड ते पाषाण

८ . सातारा -मुळशी 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply