Pune : शेतात जायला रस्ताच नाही; महिलेनं हेलिकॉप्टरसाठी सरकारकडं मागितली परवानगी

पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील एका महिला शेतकऱ्यानं सरकारकडं हेलिकॉप्टर विकत घेण्याची परवानगी मागितली आहे. पण यामागचं कारण ऐकाल तर तुम्हाला त्यामागील त्रासाची नक्कीच जाणीव होईल. पण या अजब मागणीमुळं या शेतकऱ्याची राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे. विविध माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. 

लताबाई भास्कर हिंगे (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या शेतकरी महिलेनं आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता व्हावा अशी मागणी करणारा विनंती अर्ज केला होता. यावर तहसिलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं संबंधित जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

पण या अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही त्यामुळं हे प्रकरणं रखडलं. यानंतर लताबाईंनी अनेकदा त्या अधिकाऱ्यांनी भेट घेण्याचा आणि त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा प्रयत्न करुनही या अधिकाऱ्यांची भेट होत नव्हती. अधिकारी कायमच काहीतरी कारणं सांगून चालढकल करत होते.

Satara Rain Update : साता-यात पावसाची संततधार, पाटणला दरड काेसळली; उद्या रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

दरम्यान, घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यानं या शेतकरी महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतमालाला मुख्य रस्त्यापर्यंत कसं पोहोचवायचं याचीही काळजी लताबाईंना सतावत असे. आपल्या या अडचणींकडं सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं हताश झालेल्या लताबाईंच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली

त्यानुसार, घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टर विकत घ्यावं असा विचार लताबाईंच्या मनात आला. पण पुन्हा यासाठी सरकारदरबारी परवानगी घ्यावी लागणार होती. मग काय? शेतात जायला रस्ता नसल्यानं हेलिकॉप्टरसाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी पुन्हा तहसीलदारांकडं अर्ज केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply