Pune : आषाढी एकादशीनिमित्त सरकारचं कैद्यांना मोठं गिफ्ट! भजन स्पर्धेत सहभागी झालेल्यांना शिक्षेत विशेष माफी

Pune : आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत असतानाच राज्यातील कैद्यांसाठीही राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे.

महाराष्ट्रातील कारागृहात पार पडलेल्या अभंग व भजन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व कैद्यांना प्रशासनाकडून विशेष माफीची तरतूद देण्यात आली आहे. ज्यानुसार महाअंतिम फेरीत निवड झालेल्या कारागृहातील कैद्यांना शिक्षेत ९० दिवसांची माफीची सवलत देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या एक महिन्यांपासून राज्यात आषाढी वारीचा  सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. याच निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारागृहात कैद्यांकरिता राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

BMC Covid Scam : २०० हून अधिक डॉक्टरांच्या बोगस नोंदी, कोट्यवधी उकळले; कोविड सेंटर घोटाळ्याची व्याप्ती वाढली

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माधथ्यमातून ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या कैद्यांसाठी राज्यसरकारने मोठं बक्षिस दिले असून 90 दिवस ते 30 दिवसापर्यंत विशेष माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यानुसार महाअंतिम फेरीत निवड झालेल्या कारागृहातील कैद्यांना शिक्षेत ९० दिवसांची माफी मिळणार आहे. तसेच अभंग आणि भजनात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कैद्यांना ६० दिवस तर काही कैद्यांना ३० दिवस शिक्षेत माफी मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या स्पर्धेची महाअंतिम फेरी 13 जून राेजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात पार पडली होती. यामध्ये सर्व सहभागी संघांनी भक्तीपूर्ण वातावरणात व तल्लीनतेने भजन व अभंगाचे सादरीकरण केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply