Pune : पुणे-मुंबई महामार्गावर 'भारत पेट्रोलियम'चा गॅस टँकर पलटी; अधिकाऱ्यांसह 50 पोलीस घटनास्थळी

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर शनिवारी (ता. 25) पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा (BPCL) गॅस टॅंकर पलटी झाला.प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारा टँकर कै. मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला.

सदर घटना समजताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन टीम, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, श्री. चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्यासह 50 पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहनं आली असून कार्यवाही सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *