Pune : अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग! गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाचा फटका स्मशानभूमींना

Pune : इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून महायुद्ध सुरु आहे. दोन्हीकडून एकमेकांना दमदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शनिवारी इराणच्या मोठ्या तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामुळे मोठा भडका उडाला. या युद्धाची झळ भारतवासियांना देखील बसली आहे. भारतात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. अलीकडेच गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर आता पुणे शहरातील समशानभूमीच्या महानगरपालिकेच्या गॅस आधारित विद्युत दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व APC (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील. त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *