
Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात उद्या, गुरुवारी (१९ फेब्रुवारी) मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता; तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी सातपासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
शिवाजी रस्ता
जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक - जंगली महाराज रस्ता - खंडुजीबाबा चौक - टिळक चौक - टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
केळकर रस्ता
केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग) मार्गे वळविण्यात येतील.पुरम चौक
पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक - टिळक रस्ता - अलका टॉकीज चौक - एफ. सी. रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल - बालगंधर्वकडून इच्छितस्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन - बालगंधर्व - टिळक पूलमार्गे वळविण्यात येईल. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक - जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक येथून इच्छितस्थळी जावे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक वाहन वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

