Pune : नवले पुल परिसरात पुन्हा अपघात; सलग ४–५ गाड्या एकमेकांवर धडकल्या

Pune : १३ नोव्हेंबर रोजी पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज या परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. यावेळी भुमकर पुलावर चार ते पाच गाड्या एकमेकांना भिडल्या आहेत. यात ३ गाड्याचं नुकासान झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळाली. या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

Saudi Bus Accident : काळाचा घाला! मक्केहून मदिनाकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; ४२ भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू

या घटनेनंतर पुणेकरांची चिंता वाढली आहे. या परिसरात अपघात झाल्याची आठवड्यातली दुसरी घटना आहे. यात तीन गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच एक ते दोन जणांना किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात अद्याप कोणीतीही जिवितहानी झाली नाही. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नवले पूल येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महापालिका, पोलीस, आरटोओ, पीएमआरडीए यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात नवले पूल परिसरातील अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसह अल्पकालीन उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशा सुचना त्यांनी केल्या. या कामांचा आढावा घेण्यासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *