Pune News : उरुळी कांचनमध्ये कंटेनर-ट्रकचा भयंकर अपघात, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, ५ KM पर्यंत रांगा

Pune Solapur highway accident : पुणे-सोलापूर महामार्गावर तळवडी चौकात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे येणारा कंटेनर तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत असताना सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. महामार्गावर ५ ते ६ किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि गर्दीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.

Pune : पुणे महापालिकेचा रिचार्ज संपला? ११०० अधिकाऱ्यांच्या फोनचे आउटगोइंग बंद! कारण काय?

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे कर्मचारी अक्षय कामठे, मनोज मोहोड आणि अश्वजीत रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. मात्र, पलटी झालेली वाहने आणि रस्त्यावर जमलेली गर्दी यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब होत आहे. अपघात पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केलेली गर्दी यामुळे पोलिसांना वाहतूक नियंत्रणात आणण्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी क्रेनची मदत घेतली असून, लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उरुळी कांचन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply