Pune : पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ, लिंबू ठेवणार्‍या महिलेस पोलिसांनी केली अटक

Pune : पुणे शहराचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय धनकवडे यांच्या पुण्यातील धनकवडी येथील बंगल्यासमोर एका महिलेने नारळ,लिंबू, काळा आभिर ठेवल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेप्रकरणी जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक नामदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील चार महिन्यापासून धनकवडी भागातील अनेक ठिकाणी अमावस्येच्या दिवशी अनेक घरासमोर एक महिला नारळ,दूध भात, उकडलेली अंडी,लिंबू,काळा आभिर ठेवून देत होती. तर असाच प्रकार शनिवारी २९ तारखेला अमावस्येच्या दिवशी दत्तात्रय धनकवडे यांच्या घरासमोर केला. तर या प्रकाराबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविली, त्यानंतर त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या विरोधात सहकारनगर पोलिसांनी जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्या महिलेकडे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply