Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण; बस प्रशासनाचे मोठे पाऊल; पुणे, पिंपरी चिंचवडमधील बसस्थानकांबाबत महत्त्वाचा निर्णय

Pune : पुण्यातील स्वारगेट अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर आता बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव समोर आल्यामुळे आता विविध उपाययोजना करण्यास महामंडळाने सुरवात केली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सदरच्या घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळ प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. सुरक्षितेच्या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागातील बसस्थानकांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.

Pune : मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंड गजा मारणेला सांगली कारागृहात हलवलं, प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बसस्थानकांच्या हद्दीतील १०० बस थांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार एसटी प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केला असल्याची माहिती आहे.

तसेच चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात. हे प्रवासी रात्री- अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांची गस्तही या परिसरात वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply