Pune News : लष्करात नोकरी लावण्याचं आमिष, २ तरूणांना तब्बल ५ लाखांना गंडवलं

Pune News : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरूणांना ४ लाख ८० हजार रूपयांना गंडवलं आहे. नोकरीचे आमिष दाखवून आरोपीने ४ लाख ८० हजार उकळले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच रवींद्र जनार्दन बिलाडे यानं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाडे आणि धामीची ओळख एका व्यक्तीमार्फत झाली होती. त्यावेळी धामीनं आपण लष्करी रूग्णालयात नोकरी करत असल्याचं सांगितलं. नंतर धामी याने लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे बळी पडले.

Atal Setu : अटल सेतू १३ तासांसाठी बंद, प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा

नंतर धामीने पैशांची मागणी केली.धामीने बिलाडेकडून २ लाख ८० हजार तर, त्याच्या मित्राकडून २ लाख रूपये घेतले होते. काही दिवसानंतर दोघांनी बिलाडेकडे लष्करातील नोकरी बाबत विचारणा केली. त्यानंतर धामी उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. दोघांना टाळू लागला. त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण धामी त्या दोघांना उत्तर देत नव्हता.

आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर बिलाडे आणि त्याच्या मित्रांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहायक निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत. या आरोपीने अजून कुणाला फसवले आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply