Pune : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर

Pune : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. विशेष सेवेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शमसुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे यांच्यासह राज्यातील ३९ अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

Crime case : पुण्याच्या महिला डॉक्टरला गंडवणाऱ्या डॉक्टराला बेड्या, विवाहित असताना दिला गुलिगत धोका

कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होता. या पाच जिल्ह्यातील गंभीर गुन्हे,तसेच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचे काम फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. कोल्हापूर,सातारा, मिरज, विशालगड येथील जातीय तणाव, तसेच आरक्षणविषयक आंदोलनांचा बंदोबस्त फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला होता. सामाजिक शांतता राखण्यासाठी सातत्याने बैठका, तसेच ग्रामस्थांशी संवाद ठेवल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली नाही. पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात गडचिरोली, चंद्रपूर या भागात त्यांनी काम केले. माओवादी क्षेत्रात त्यांनी केले. नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक शहरात ते नियुक्तीस होते. गंभीर गुन्हे उघडकीस आणणे, तसेच कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम त्यांनी केले. पालखी बंदोबस्ताची आखणी करुन पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यात आाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ४५ कोटी रुपायंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुणे शहरात सायबर गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त असताना फुलारी सायबर लॅबची स्थापना करण्यात महत्वाची भूमिक बजावली होती.

उपअधीक्षक सुनील तांबे हे सध्या कारागृहातील दक्षता विभागात नियुक्तीस आहेत. तांबे हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. ३६ वर्षांच्या सेवेत त्यांना ४०० हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. दिवे आगर येथील गणेश मूर्तीच्या दागिने चोरीचा शोध लावल्याबद्दल तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते १० लाख रुपयांचे बक्षीस त्यांच्या पथकाला मिळाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ मेफेड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. गुन्हे शाखेत सहायक आयुक्तपदी नियुक्तीस असताना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून तीन हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतूक करुन २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

तांबे हे २०१५ मध्ये राज्य दहशतवादी विरोधी पथकात (एटीएस पुणे) नियुक्तीस होते. फरार असलेला माओवादी अरुण भेलके आणि त्याच्या साथीदारांनी एटीएस पथकाने अटक केली होती. छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकात नियुक्तीस असताना त्यांनी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात १७ जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेतील तत्कालिन सहायक आयुक्त सुनील तांबे आणि पथकाने केला होता. कुरकुंभ औद्योगिक वसाहत मेफेड्रोन प्रकरण, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण, गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास तांबे आणि त्यांच्या पथकाने केला होता. त्यांनी सातारा, पुणे ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर, पुणे शहर, मुंबईत काम केले होते. मितभाषी स्वभावााचे तांबे यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शमसुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply