Pune News : परदेशात गाड्या चालवण्यातही पुणेकर अव्वल, १४ हजार ७७४ पुणेकरांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स

 

Pune News : पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात १४ हजारे ७७४ पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीमार्फत हा आकडा समोर आला आहे. यावरुन परदेशात स्थलांतर करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे लक्षात येते.

परदेशात वाहन चालवण्यासाठी भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी ती व्यक्ती देशातील ज्या ठिकाणी राहते, तेथील आरटीओकडून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. वाहनचालक परवाना (लायसन्स), व्हिसा अशा कागदपत्रांची तपासणी करुन आरटीओकडून परवाना दिला जातो.

Lakhandur News : बोगस कंपनी व्यवसाय करून १ कोटींची फसवणूक; लाखांदुरमधून चार जण ताब्यात

२०१८ पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीने केली जात असे. त्यामुळे परवाना मिळवण्यासाठी वेळ लागत असे. नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. यासाठी अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन 'सारथी'अंतर्गत अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात.

आरटीओद्वारे अर्जदारांची कागदपत्रे तपासून एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. मागील तीन वर्षात हा परवाना काढण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२-२३ मध्ये ४,२९४; २०२३ मध्ये ५,२१० आणि जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये ५,२७० पुणेकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला गेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply