Pune News : पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल

 

Pune : पुण्यामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. १८ दिवसांत ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे.

पुणे महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली असून ४५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

१८ दिवसांत आकारलेला दंड -

- रस्त्यावर थुंकणे - १ लाख २६ हजार

- उघड्यावर लघु शंका करणे - ९१ हजार ७००

- कचरा जाळणे - ५५ हजार

- कचरा वर्गीकरण न करणे - १ लाख ५ हजार

- बंदी असलेला मांजा विक्री - २५ हजार ५००

- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता- १८ लाख २१ हजार २००

- कचरा प्रकल्प बंद असणे- ४० हजार

- बांधकाम राडाराडा - ५ लाख ५८ हजार

- प्लास्टिक कारवाई- ७ लाख ५५ हजार

- बायोमेटिकल वेस्ट - १५ हजार

- इतर - ५ हजार

Mumbai News : धक्कादायक! कूपर रूग्णालयाबाहेर ४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह,विष देऊन मारल्याचा संशय

दुसरीकडे रात्रीतून पुणे शहर चकाचक होणार आहे. सकाळी शहर स्वच्छ असावे यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने याचे नियोजन महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे.

एकीकडे बेशिस्त नागरिक अन् दुसरीकडे सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनाला उशीर होत असल्याने शहरात कचरा दिसत आहे. पण सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगले वातावरण अनुभवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रात्रीतून शहर स्वच्छ करण्याचा मुद्दा पुढे आला.

महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध असणार आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करत आहे. कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यापुढे पुणे शहरामध्ये कुठेच कचरा दिसणार नाही.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply