Pune News : २०२५ च्या पहिल्याच रात्री ८५ मद्यपींना अटक, मद्यपान करून गाडी चालवणे पडले महागात

Pune News : नववर्षाच्या मध्यरात्री वाहतूक पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ८५ जणांवर कठोर कारवाई करण्यात आली, तर भरधाव गाडी चालवणाऱ्या २,६३३ चालकांवर दंड लादण्यात आला. या मोहिमेत एकूण २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी शहरातील २७ ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीच्या दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार, तसेच वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलल्याने अनेकांची नशा उतरली. नववर्ष साजरे करताना सुरक्षितता आणि जबाबदारीचे पालन करण्याचा इशारा यामुळे पुन्हा देण्यात आला आहे.

विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वाहतूक अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या ९०२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, हेल्मेट न घालणाऱ्या २३ जणांवर, वाहतुकीचे सिग्नल तोडणाऱ्या ११८ जणांवर, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६३२ जणांवर, आणि परवाना नसतानाही वाहन चालवणाऱ्या २३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही मोहीम वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी आणि सुरक्षितता वाढावी या उद्देशाने राबवण्यात आली. पोलिसांनी कठोर पावले उचलून नियम पाळण्याचे महत्व अधोरेखित केले.दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणारे १७६, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणारे ४९, धोकादायक पद्धतीने गाडी चालवणारे ५६ आणि वाहतुकीचे नियम मोडणारे ५५२ जणांवर दंड लादण्यात आला. याशिवाय, विविध प्रकारच्या उल्लंघनांसाठी एकूण २६३३ वाहनचालकांवर कारवाई करून १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. कठोर पावले उचलत पोलिसांनी वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश दिला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply