Pune : क्षेत्रीय कार्यालयाचा दणका! ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने सोसायटीला एक लाखाचा दंड

कोंढवा (पुणे) : परिसरात दुर्गंधी पसरविण्यासाठी अनेकवेळा नागरी गृहरचना संस्था, सोसायट्याच जबाबदार ठरत असतात. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असते. अशाच प्रकारे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील राजगृही गृहरचना सोसायटीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडून आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केल्याबद्दल सोसायटीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, वरिष्ठ आरोग्यनिरिक्षक मंगलदास माने, विकास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ४१, काकडे वस्ती आरोग्य कोठी अंतर्गत येणाऱ्या प्रभागात आरोग्य निरिक्षक अभिजीत सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता नरेश शिंगटे, दयानंद तेलंगे, मिलिंद भोसले यांनी हा दंड वसूल केला आहे.

यापुढेही अशा प्रकारे परिसरात दुर्गंधी पसरविणाऱ्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रभारी मुख्य आरोग्य निरिक्षक विकास मोरे यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply