Pune News : पुण्यात अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, घरच्यांना घातपाताचा संशय; मात्र पोलीस म्हणतात पोरीनं...

Pune  : येरवडा परिसरात एका सोळा वर्षीय मुलीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्या मुलीच्या अल्पवयीन मित्राने पोलिसांसह अन्य कोणालाही न सांगता गळफास घेतलेल्या मैत्रिणीला परस्पर खाली उतरविल्याने पालकांनी तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने मद्यप्राशन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

तनीषा शांताराम मनवरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येरवडा भागातील शनी आळी भागात आई सुरेखासोबत तनीषा वास्तव्याला होती. तनीषा आणि नागपूर चाळ परिसरात राहणारी तिची मैत्रीण डॉन बॉस्को शाळेत शिकण्यास होती. दोघीही दहावी उत्तीर्ण होऊन पुण्यातील महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. सोमवारी सायंकाळी तनीषाने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावून घेतले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिची मैत्रीण वरच्या खोलीत असताना तनीषाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. काही वेळाने तिचा मित्र माघारी घरी आल्यावर तनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे तिच्या अल्पवयीन मित्राने पोलिसांना माहिती देण्याआधी स्वतः मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर पळत जाऊन भाजी विक्री करणाऱ्या तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद

येरवडा पोलिस घटनास्थळी आल्यावर तनीषा आणि बेशुद्ध पडलेल्या तिच्या मैत्रिणीला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तनीषाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गळफास घेतल्याने तनीषाचा मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिले. तनीषा खूप हुशार मुलगी होती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिच्या आत्महत्येमागे घातपात असल्याचा संशय वडील शांताराम मनवरे यांनी केला.

नातेवाइकांनी रुग्णवाहिका अडवली

ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी तनीषाचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका येरवड्यात दाखल झाली. त्या वेळी मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी नातेवाइकांनी येरवड्यातील चित्रा चौकात रुग्णवाहिका अडवून मुलीवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दोन्ही अल्पवयीन मुली घरात असताना मैत्रीण वरच्या खोलीत गेल्यावर तनीषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा अल्पवयीन मित्र घरी आल्यावर घटना उघडकीस आली. मित्राने मृतदेह खाली उतरविल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांकडून याची सखोल चौकशी सुरू केली असून, मुलीने तणावाखाली आत्महत्या केल्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply