Pune News : धक्कादायक! मुलांच्या जीवाशी खेळ सुरू, पोषण आहारात आढळल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा

Pune News : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लहान मुलांना अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आणि अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील जनता वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकराचा पोषण आहार देऊन सरकार  मुलांच्या जीवाळी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यात उंदरांच्या लेंड्या आणि अळ्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार २५ जूनला समोर आला होता. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि आळ्या लागल्याचे समोर आले होते. स्थानिक ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply