Pune News : महापालिका शिक्षकांच्या आरोग्य तपासणीवरून गोंधळ

Pune News : पुणे महापालिकेच्या शाळांसाठी पवित्र पोर्टलच्यामाध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांची गाडीखाना येथील डॉ. कोटनीस दवाखान्यात आरोग्य तपासणी करणार असल्याने सुमारे २०० शिक्षक तेथे आज सकाळी हजर झाले. मात्र, शनिवार दुपारनंतर दवाखाना बंद असल्याने गोंधळ उडाला. या शिक्षकांची पुढील आठवड्यात तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वजण माघारी फिरले.

अनेक वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. सुमारे ५५० हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरु केल्याने त्यामधून महापालिकेला २२१ शिक्षक मिळाले आहेत. शुक्रवारी (ता. १४) महापालिकेत त्यांचे समुपदेशन करून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच शाळांचे वाटपही करण्यात आले. समुपदेशनाच्या ठिकाणी डॉ. कोटनीस दवाखान्यातून आरोग्य तपासणी करून घ्या, त्यानंतरच शाळांमध्ये हजर करून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Pune Crime News : भयंकर! पत्नीला गोड बोलून लॉजवर नेलं अन्... तरुणाच्या कृत्याने पुणे हादरलं

त्यामुळे शनिवारी (ता. १५) सकाळी आरोग्य तपासणीसाठी २०० शिक्षक त्या ठिकाणी हजर झाले. आज दुपारी सुट्टी आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी होणार नाही, असे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच अनेकांना ३, ४ जुलै अशा तारखा देवून नोंद करून घेतली. त्यावरून गोंधळ सुरु झाला. काही जणांची तपासणी करण्यात आली. मात्र, आरोग्य तपासणीचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शाळेमध्ये रुजू करून घेतले जात नाही, त्यामुळे सर्व शिक्षक भांबावून गेले. महापालिका अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर या शिक्षकांना आज येण्याचा निरोप कोणी दिला?, असा प्रश्न उपस्थित केला.

आज शिक्षकांना आरोग्य तपासणीसाठी बोलविण्यात आलेले नव्हते. या शिक्षकांची मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवसांत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टर व इतर मनुष्यबळाचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply