Pune News : मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय!

Pune News : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द  केले आहे.  500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला  आहे.   2013  मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी  प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी कोर्टात जाण्याअगोदर दिली होती. 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील  हे पुणे न्यायालयामध्ये दुपारी 12 वाजता पोहचले. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले आहेत.

Dombivali News : डोंबिवलीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; ४ बार अँड रेस्टॉरंटला ठोकले सील

जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम 156 (3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्याच प्रकरणात आज सुनावणी झाली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply