Pune News : रवींद्र धंगेकरांनी दोन दिवसांत माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफांचा इशारा

Pune News : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली. याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शित्रणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्याच आशीर्वादाने ससूनमधील २ डॉक्टर काम करत होते, असं धंगेकर यांनी म्हटलं. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकर यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून याबाबत त्यांनी दोन दिवसांत माफी मागावी, अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. रवींद्र धंगेकर यांना मी चांगला नेता समजत होतो, पण ते प्रसिद्धीसाठी असे स्टंट करतील, असं मला वाटलं नव्हतं. असंही मुश्रीफ म्हणाले.

Malegaon Firing : मालेगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या, परिसरात खळबळ

जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा मी परदेशात होतो. प्रसारमाध्यमांमध्ये मी अपघातासंदर्भातील बातमी वाचली. दरम्यान, आजच माझा आणि रवींद्र धंगेकरांचा फोन पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि सीडीआर तपास करावा, असंही मुश्रीफ म्हणाले. धंगेकर यांच्यासारख्या खोटं पसरवणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावीच लागेल, असंही मुश्रीफ म्हणाले.

रवींद्र धंगेकर यांनी काय आरोप केले होते?

ससून रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला होता. मी गेल्या एक वर्षापासून यावर बोलत आहे. पण सरकार अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. अजय तावरे या व्यक्तीला त्या पदावर बसवण्याचे काम केलं आहे.

मुश्रीफ असं वागत असतील तर यांच्याकडून काय अपेक्षा करायची. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. अजय तावरे हा गेल्या अनेक वर्षांपासून रिपोर्ट बदलणे असले काम करत आला आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply