Ravindra Dhangekar : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ले, धंगेकरांचा आरोप! आयुक्तालयासमोर बसले आंदोलनाला

 

Ravindra Dhangekar : पुणे पोर्शे अपघात प्रकरणाला नवीन वळ मिळत आहेत. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर पोलीस आयुक्तलयासमोर आंदोलनाला बसले आहेत. या अपघात प्रकरणात पोलीयांनी पैसे खाल्ल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी, अर्शी मागणी त्यांनी केली. 

आमदार झाल्यानंतर मी सातत्याने अमली पदार्थ, पब संस्कृती पुण्यातून हद्दपार करा, अशी मागणी मी केली. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अभियंत्यांची पुण्यात हत्या झाली. ज्या प्रकारे पुणे पोलिसांनी याचा तपास केला. या तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. दोन एफआयर बनवण्यात आले. पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांना इथं यावं लागलं. त्यांनी पुणेकरांची समजूत काढण्यासाठी दुसरी एफआयर दाखल केली. मात्र तपास अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहीजे. गुन्हा दाखल केला नाही तर मी सेज पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला.

या अपघात प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला. एक बिल्डरचा पोरगा पोलीस स्टेशनमध्ये पिझा पार्टी करतो आणि लाल कारपेट टाकून तो घरी देखील जातो. त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जी मुले मृत्यूमुखी पडले त्याच्या पंचनाम्यासाठी देखील पोलीस आले नव्हते. त्याआधी आरोपी घरी होते, असे धर्गेकर म्हणाले,

रवींद्र धंगेकर म्हणाले, पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आपला मुलगा पुण्यात शिकायला गेला तर सुरक्षित आहे का?, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. विद्येच्या माहेरघराला तडा लावण्याचे काम पाकिट संस्कृती आणि पोलिसांच्या माध्यमातून होत आहे. A

पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचतात, पोलीस अधिकाऱ्याऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळल नाही. पोलीस खात्यावर पैशाच्या पाकिटांचे वजन आहे. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता. कुठल्या हॉटेलमध्ये डील झाली, कुणाला फोन केले. या सर्व गोशीचा तपास आला पाहीजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply